Government Scheme : नव्या वर्षात' या' योजनेचा होणार शुभारंभ; गावखेड्यातील जमिनी होणार सुरक्षित!

Rashmi Mane

जमिनीवरून वाद-विवाद

ग्रामीण भागात खेड्यापाड्यांमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद-विवाद होतात.

Swamitva Yojana | Sarkarnama

पारदर्शकतेच्या दृष्टीने

काही गावात इतरांच्या जमिनीवर कब्जा करण्यासारखे प्रकार होत असतात. जमिनीच्या कागदपत्रांबद्दल माहिती नसते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासह अधिक पारदर्शकतेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Swamitva Yojana | Sarkarnama

जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग

ग्रामीण भागात 'आर्थिक प्रगती' आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञानासह गाव सर्वेक्षण आणि मॅपिंग योजना सुरू केली होती.

Swamitva Yojana | Sarkarnama

‘स्वामित्व’ योजना

जमीन मालकीसंदर्भात राबण्यात येणारी ‘स्वामित्व’ योजना 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Swamitva Yojana | Sarkarnama

मालमत्ता कार्ड

राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठानात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायीक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे मालमत्ता कार्ड मिळावे हा या योजनेमागचा उद्देश आहे

Swamitva Yojana | Sarkarnama

'प्रॉपर्टी कार्ड'

12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50,000 हून अधिक गावांमधील मालमत्ता मालकांना 58 लाखांहून अधिक मालमत्ता कार्ड 'हक्क दस्तऐवज' म्हणजेच 'प्रॉपर्टी कार्ड'चे दिले जाणार आहे.

Swamitva Yojana | Sarkarnama

मालमत्ता कार्ड

छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशातील 50,000 गावांतील 58 लाख मालमत्ताधारकांना मालमत्ता कार्ड जारी केले जाणार आहे.

Swamitva Yojana | Sarkarnama

Next : 2024 मध्ये बाबा सिद्दीकी ते रतन टाटा; 'या' दिग्गज व्यक्तीचे निधन 

येथे क्लिक करा