Roshan More
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सोशल मिडीयावर पोस्ट करत त्या म्हणाल्या, राज्याच्या आर्थिक शिस्तीची परंपरा मजबूत करणाऱ्या अजितदादांच्या कार्याची आज फार आठवण येतेय.
राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा व प्रश्नांना न्याय देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देणारे लोकहिताचे व्यापक निर्णय या अधिवेशनातून पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.
विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांची देखील भेट घेतली.