Roshan More
शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दचे आज 60 व्या वर्षांत (हीरक महोत्सव) पदार्पण झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
सन 1967 साली आजच्या दिवशी (22 फेब्रुवारी) त्यांचा संसदीय कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला आणि आमदार म्हणून ते पहिल्यांदा विजयी झाले.
शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री झालेले नेते आहेत. त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
1967 ते 1990 असे सलग त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.
केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून तसेच कृषीमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
10 जून 1999 ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.