नसीब अपना अपना! आमदार नसताना 'हा' नेता दोनदा कॅबिनेट मंत्री

Rajanand More

मंत्रिपद

मंत्रिपद मिळावे, यासाठी नेत्यांकडून जोरदार फिल्डींग लावली जाते. आमदार असो-नसो, मंत्रि‍पद मिळू शकते. त्यासाठी सहा महिन्यांत सदस्यत्व मिळविणे बंधनकारक असते. त्यामुळे अनेकदा पक्षश्रेष्ठींच्या मर्जीने अशा नेत्यांना संधी मिळते.

Political Leader | Sarkarnama

दीपक प्रकाश

सध्या देशाच्या राजकारण दीपक प्रकाश हे नाव गाजत आहे. त्यांनाही आमदार नसताना एकदा नव्हे दोनदा मंत्रिपद मिळाले आहे. आता हे कसे शक्य झाले, ते पाहुयात.

Deepak Prakash | Sarkarnama

कोण आहेत?

दीपक प्रकाश हे बिहारमधील Rashtriya Lok Morcha पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशावह यांचे पुत्र आहेत. त्यांनी पहिल्यांदा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Deepak Prakash | Sarkarnama

सरकार बरखास्त

सहा महिन्यांत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळविणे बंधनकारक होते. पण ही मुदत संपण्याआधीच १५ एप्रिल २०२६ रोजी सरकार बरखास्त झाले.

Deepak Prakash | Sarkarnama

दुसऱ्यांदा शपथ

दीपक प्रकाश यांची ७ मे २०२६ रोजी दुसऱ्यांदा मंत्रि‍पदाची शपथ घेतली. सहा महिन्यांची मुदत २० मे २०२६ रोजी संपली होती. पण त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे.

Deepak Prakash | Sarkarnama

प्रकरण कोर्टात

हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. त्यांचे मंत्रिपद रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल झाली आहे.

Deepak Prakash | Sarkarnama

संविधानाचे उल्लंघन

सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्याने संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Deepak Prakash | Sarkarnama

आयोगाला नोटीस

सुप्रीम कोर्टाने यावर आता निवडणूक आयोग आणि बिहार सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता दीपक प्रकाश यांचे मंत्रिपद टिकणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Deepak Prakash | Sarkarnama

NEXT : केंद्रात 8 वर्षे मंत्री, सत्ता जाताच काँग्रेसला सोडचिठ्ठी; आता 'या' नेत्याची वाताहत...

येथे क्लिक करा.