केंद्रात 8 वर्षे मंत्री, सत्ता जाताच काँग्रेसला सोडचिठ्ठी; आता 'या' नेत्याची वाताहत...

Rajanand More

जी. के. वासन

तमिळनाडूतील तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार) या पक्षाचे अध्यक्ष आहेत जी. के. वासन. त्यांनी रविवारी (ता. १४ जून) एनडीए आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

G K Vasan | Sarkarnama

काय आहे इतिहास?

वासन हे तमिळ मनिला काँग्रेस (टीएमसी) या मुळ पक्षाचे संस्थापक जी. के. मूपनार यांचे पुत्र आहेत. मूपनार हे तमिळनाडू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

G K Moopnar | Sarkarnama

काँग्रेसमध्ये फूट

मूपनार यांनी १९९६ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत टीएमसीची स्थापना केली. त्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले.

G K Moopnar | Sarkarnama

विलीनीकरण

मूपनार यांच्या निधनानंतर पुत्र वासन यांनी २००२ मध्ये टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरन केले. त्यानंतर ते तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

G K Vasan | Sarkarnama

केंद्रात मंत्री

काँग्रेसने वासन यांना २००२ आणि २००८ असे दोनदा राज्यसभेवर पाठविले. २००९-२०१४ या काळात त्यांच्याकडे काँग्रेस सरकारमध्ये पाच वर्षे जहाजबांधणी मंत्रिपद होते. तर २००६-२००९ मध्ये राज्यमंत्री होते.

G K Vasan | Sarkarnama

नवा पक्ष

काँग्रेसची केंद्रातील सत्ता जाताच वासन यांनी २०१४ मध्ये पक्षातून बाहेर पडत टीएमसी (मूपनार) पक्षाची स्थापना केली. २०१९ मध्ये ते एनडीएसोबत गेले.

G K Vasan | Sarkarnama

पुन्हा खासदार

एनडीएकडून त्यांना २०२० मध्ये राज्यसभेवर पाठविण्यात आले. ते एप्रिल २०२६ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. मात्र, पुन्हा संधी मिळाली नाही.

G K Vasan | Sarkarnama

वाताहत

विधानसभा निवडणुकीत पक्षाला भाजपच्या तिकीटावर उमेदवार उतरविण्याची वेळ आली. पण एकही उमेदवार विजयी झाला नाही. आता ते एनडीएतून बाहेर पडले आहेत.

G K Vasan | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींनी मित्रपक्षांना दिला 'बुस्टर डोस'; उद्धव ठाकरेंचाही उल्लेख, वाचा दहा महत्वाची विधाने...

येथे क्लिक करा.