Rashmi Mane
कुमाऊँचे विभागीय आयुक्त दीपक रावत यांचे यूट्यूबवर 40 लाखांहून अधिक सब्सक्रायबर आहेत आणि ट्विटरवर 46 हजारांहून अधिक लोक त्याना फॉलो करतात.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या दीपक रावत यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.
दीपक रावत यांचा जन्म 24 सप्टेंबर 1977 ला उत्तराखंडमधील मसुरी येथे झाला.
त्यांचे शालेय शिक्षण मसुरीच्या सेंट जॉर्ज कॉलेजमधून झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून इतिहासात बी.ए. जेएनयू, दिल्ली येथून इतिहासात एमए आणि एमफिल देखील केले आहे.
दीपक रावत शाळेत असताना त्यांना आर्मी मॅन व्हायचं होतं, पण दीपक स्वत:ला या दोन्हीसाठी अनफिट समजत होते.
IPS अनिल कुमार रातुरी हे दीपक रावत यांच्या मसुरी येथील घराच्या शेजारी राहत होते. रावत यांना त्यांच्याकडूनच यूपीएससी परीक्षेची माहिती मिळाली.
दिल्लीत शिकत असताना दीपक रावत यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दीपक रावत यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. ते 2007 मध्ये 12 व्या रँकसह IAS अधिकारी झाले.
2011 ते 2012 पर्यंत दीपक रावत हे बागेश्वरचे जिल्हाधिकारी होते. 2014 ते 2017 पर्यंत जिल्हधिकारी म्हणून नैनितालमध्ये तैनात होते. 2017 पासून हरिद्वारमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.