Rashmi Mane
संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर विरोधी पक्ष म्हणजेच INDIA आघाडी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची आज (19 डिसेंबरला) एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आज होणाऱ्या INDIA आघाडीच्या बैठकीत बहिष्कारबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत जवळपास चाळीसहून अधिक खासदारांचे विविध कारणांवरुन निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधक संतप्त असून ते बहिष्काराच्या भूमिकेपर्यंत आले आहेत.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात ही बैठक होत आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बैठकीत निर्णय घेणार आहेत.
या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.