Vijaykumar Dudhale
सांगोला मतदारसंघातून मागील 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडून आले आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे यांनी शहाजी पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्याच्या जोरावर शहाजीबापू हे 768 मतांनी निवडून आले होते.
मागील 2019 च्या निवडणुकीवेळी शहाजी पाटील यांनी पुढील म्हणजे 2024 च्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी त्यावर कधीही भाष्य केलेले नाही
दीपक साळुंखे हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते.
माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. एका खासगी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
दीपक साळुंखे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना शहाजी पाटील यांनी मैदान लढणारी माणसं मैदानात येणारच आहेत, निवडणुका होणारच आहेत. जनता जो कौल देईल, तो प्रत्येकाला स्वीकारावा लागणार आहे, असे सांगितले.
मी सदैव मैदानात असतो, मैदान सोडायची मला सवय नाही. आगामी विधानसभेची निवडणूक मी सांगोला मतदारसंघातून ताकतीने लढणार आहे, असे आव्हानच शहाजी पाटील यांनी विरोधकांना दिले
आमदार शहाजी पाटील यांनी दिलेले आव्हान माजी दीपक साळुंखे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत स्वीकारणार का, हा खरा प्रश्न आहे.