सरकारनामा ब्यूरो
UPSC परीक्षेत अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा तयारी करीत यशाचे शिखर गाठणारे मोजकेच असतात, त्यापैकीच एक आहेत दीपिका पाटीदार.
दीपिका पाटीदार या मूळच्या मध्य प्रदेशमधील जामगोद येथील रहिवासी आहेत.
दीपिका यांनी जामगोद या गावातील सरकारी शाळेतून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणात हुशार असल्यांने त्यांनी पाटीदार समाजातील बोर्डिंग शाळेतून बारावी पास केली.
होल्कर सायन्स कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युशन पूर्ण केले. यानंतर त्या दिल्लीला रहायाला आल्या आणि MPPSC करण्याचे ठरवत परीक्षेची तयारी सुरु केली.
2018 ला त्यांनी बीएससी एमए चा अभ्यास सुरु केला. आणि याचवर्षी त्यांनी परीक्षा दिली परंतु त्यांना या परीक्षेत अपयश आले.
दीपिका यांनी 2019 ते 2022 या कालावधीत चार वेळा परीक्षा दिली परंतु त्यांना चारही वेळेला अपयशाचा सामना करावा लागला.
दीपिका यांनी न डगमगता MPPSCPCS पाचव्यांदा परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 2022 ला लागला. यामध्ये दीपिका यांना 902.75 रँकसह संपूर्ण राज्यात अव्वल स्थान मिळवले.
त्यांच्या रँकसह त्यांची नियुक्ती उपजिल्हाधिकारी या पदासाठी करण्यात आली आहे.