सरकारनामा ब्यूरो
'आयपीएस' तृप्ती भट्ट या उत्तराखंडच्या अल्मोरा येथील आहेत.
त्यांनी आपले 12वी पर्यंतचे शिक्षण अल्मोरा येथील केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले.
उत्तराखंडच्या पंतनगर विद्यापीठातून त्यांनी 'मेकॅनिकल इंजिनिअरिंग'ची पदवी प्राप्त केली.
'इंजिनिअरिंग' पूर्ण केल्यावर त्यांनी 'एनटीपीसी' मध्ये नोकरी करत 'यूपीएससी'ची तयारी करण्यास सुरुवात केली.
इस्रो आणि मारुतीसारख्या मोठ्या कंपनीच्या नोकऱ्या नाकारून त्यांनी आयपीएसचे स्वप्नं पूर्ण करण्याचे ठरवले.
2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नात देशात 165वा रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि उत्तराखंड केडर मिळवले.
शाळेत असताना राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या दिलेल्या पत्रातून मिळालेल्या प्रेरणेने त्यांनी अधिकारी व्हायचं ठरवलं.
तृप्ती या 'बॅडमिंटन', 'तायक्वांदो' आणि 'कराटे' खेळातील उत्कृष्ट खेळाडू आहेत.