Deepak Kulkarni
भाजपने महाराष्ट्रातील आपल्या काही दमदार नेत्यांना मध्यप्रदेशच्या मोहिमेवर धाडले होते. त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगेही होते.
त्यांच्याकडे रायसेन जिल्ह्यातील भोजपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.
लांडगे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यासाठी वीस दिवस तेथे ते तळ ठोकून होते.
दिवाळीतही ते इकडे महाराष्ट्रात फिरकले नाहीत.
भोजपूरची जागा निवडून आणण्यात महाराष्ट्राचा हातभार लावताना लांडगेंनी किल्ला लढवला..
भोजपूरमधून भाजप उमेदवार सुरेंद्र पटवा दणदणीत विजयी झाले.
त्यांनी कॉँग्रेसचे राजकुमार पटेल यांचा 40 हजार 779 मतांनी पराभव केला.
यापूर्वी पक्षाने आमदार लांडगेंना गोव्यातील म्हापसा आणि कर्नाटकात एका मतदारसंघाची जबाबदारी...
मध्य प्रदेशची मोहीम यशस्वी करून त्यांनी आमदार करण्याची हॅट्ट्रिक केली.