Jagdish Patil
माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे.
निकालाची आकडेवारी पाहता दिल्लीत भाजपची बहुमताचे सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू आहे.
एकीकडे भाजपचा वियज झाला आहे तर दुसरीकडे केजरीवाल, मनीष सिसोदीया यांच्यासह आपचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.
आपचे दिग्गज नेते पराभूत झाले असताना विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्या विजयामुळे पक्षाची लाज राखली गेली आहे.
कालकाजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रमेश बिथूडी यांचा 2700 मतांनी पराभव करत आतिशी यांनी विजय खेचून आणला.
माजी CM केजरीवाल यांनी दारू घोटाळा प्रकरणी राजीनामा देताच आतिशी यांची CM पदी वर्णी लागली. त्यामुळे शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला.
आपने 2019 ला पूर्व दिल्ली लोकसभेची उमेदवारी आतिशी यांना दिली होती. मात्र भाजपच्या गौतम गंभीर यांनी त्यांचा पराभव केला.
त्यानंतर 2020 ची दिल्ली विधानसभा निवडणूक कालकाजी मतदारसंघातून लढवली आणि त्या विजयी झाल्या.
आतिशी या माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या. सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी दिल्लीचं शिक्षण खातं सांभाळलं होतं.