Jagdish Patil
नवी दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार देताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रतापराव जाधव सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले.
शिंदे म्हणाले, "पवार साहेबांची राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही. कधीकधी शेजारी बसलेल्या लोकांवर पण ते गुगली टाकतात."
पण माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी कधी माझ्यावर गुगली टाकली नाही आणि भविष्यातही टाकणार नाहीत, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
तर, ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम शिंदेंनी केलं. पक्षीय अभिनिवेश न ठेवता लोकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी लक्षकेंद्रित केलं, असं शरद पवार म्हणाले.
हा सन्मान "शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून होतोय याचा मला मनापासून आनंद असल्याचंही पवार म्हणाले.
मात्र, या दोन नेत्यांची जवळीक ठाकरेंच्या शिवसेनेला आवडली नसल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांनी शिंदेंना पुरस्कार देण्यावरून शरद पवारांवर टीका केली.
पवारांच्या हातून असा पुरस्कार देणं हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. त्यांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं, राजकारण आम्हालाही कळतं, असं राऊत म्हणाले.