Rashmi Mane
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील वैष्णवी पॉलने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2022 मध्ये 62 वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नाव उंचावले.
वैष्णवीने तिचे शालेय शिक्षण गोंडा येथे पूर्ण केले. यूपीएससीमध्ये त्या चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाल्या.
जिल्ह्यातील फातिमा स्कूलमधून इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतलेल्या वैष्णवीने दिल्लीतील लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
यूपीएससी परीक्षा देण्याची मुख्य प्रेरणा त्यांना वर्तमानपत्र वाचण्यातून मिळाली. वैष्णवी त्यांच्या इंटरव्यू म्हणाली की तिने स्वतःला आयएएस होण्याचे वचन दिले होते,
जर तुमचे ध्येय ठरलेलं असेल आणि तुमचे स्वप्न निश्चिच पूर्ण होईल. कठोर परिश्रम आणि न घाबरता परीक्षेला सामोरे जा वैष्णवीने या यशाचे श्रेय तिच्या पालकांना, शिक्षकांना आणि मित्रांना दिले आहे.
'मुलाखतीत मला बरेच प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये एक प्रश्न होता की, जर तुम्ही जिल्हा दंडाधिकारी झालात आणि पूर्वीच्या डीएमचे तिथल्या एसपीशी चांगले संबंध नसतील तर तुम्ही काय कराल. मी आत्मविश्वासाने उत्तर दिले की मी त्याच्यासोबत सकारात्मक दृष्टिकोनाने नव्याने सुरुवात करेन.