Pradeep Pendhare
दिल्लीतील भाजप मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना झेड-सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या झेड-सुरक्षा व्यवस्थेत बदल करत त्यांना CRPF जवान तैनात करण्यात होते. पण आता दिल्ली पोलिसांनी सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याजवळ कुणताही व्यक्ती जवळ जाऊ शकत नाही. जनसेवा निवासस्थानी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
झेड-सुरक्षा व्यवस्था तिसरी उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून, यात दिल्ली पोलिस, ITBP आणि CRPF जवान देखील सहभागी असू शकतात.
झेड-सुरक्षा व्यवस्थेत 22 कर्मचारी सहभागी असतात. चार किंवा सहा कमांडोंबरोबर पोलिस कर्मचारी असतात. यात CRPF जवान देखील असतात.
रेखा गुप्ता यांच्या झेड-सुरक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलांमध्ये CRPF जवानांचा मोठा सहभाग करण्यात आला होता.
देशातील बहुमतांशी मुख्यमंत्र्यांना झेड-सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. परंतु त्याचा खर्च कोण करतो, हा प्रश्न आहे.
झेड-सुरक्षा व्यवस्था सरकारकडून देण्यात आली, तर त्याचा खर्च सरकारच करते.