सुप्रीम कोर्टातील नियुक्ती वादात; मुळचे गुजरातचे न्यायमूर्ती विपुल पांचोलींचा असा आहे इतिहास

Rajanand More

सुप्रीम कोर्ट कॉलेजियम

सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती विपुल पांचोली यांना दिलेली बढती वादात सापडली आहे. कॉलेडियमच्या सदस्य असलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

Supreme Court | Sarkarnama

CJI प्रमुख

सरन्यायाधीश भूषण गवई हे कॉलेजियमचे प्रमुख असून त्यामध्ये पाच न्यायमूर्ती सदस्य आहेत. न्यायमूर्ती पांचोली यांच्यासह या कॉलेजियमने मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना सुप्रीम कोर्टात बढतीची शिफारस केली आहे.

CJI Bhushan Gavai | Sarkarnama

काय आहेत आक्षेप?

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी आक्षेप घेतला आहे की, न्यायमूर्ती पांचोली यांना बढती दिल्यास गुजरातचे तीन न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टात असतील. तसेच त्यांच्यापेक्षा वरिष्ठ न्यायमूर्तीही देशात आहेत.

Justice Nagarathna | Sarkarnama

न्यायमुर्ती पांचोली

न्यायमूर्ती पांचोली हे सध्या पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. 21 जुलै रोजीच त्यांनी या पदाची शपथ घेतली. जुलै 2023 मध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांची पटना हायकोर्टात बदली झाली होती.

Justice Vipul Pancholi | Sarkarnama

गुजरात कनेक्शन

न्यायमूर्ती पांचोली हे मुळचे गुजरातचे आहेत. पटनामध्ये बदली होण्यापूर्वी ते गुजरात हायकोर्टात 2014 पासून न्यायमूर्ती होते. त्यांनी 1991 पासून गुजरात हायकोर्टात प्रॅक्टीस सुरू केली होती.

Justice Vipul Pancholi | Sarkarnama

अहमदाबादमध्ये जन्म

अहमदाबादमध्ये 28 मे 1968 रोजी जन्म. विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर गुजरात विद्यापीठातून मास्टर ऑफ लॉ इन कमर्शियल ग्रुपमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Justice Vipul Pancholi | Sarkarnama

सरकारी वकील

गुजरात हायकोर्टात मार्च 2006 पर्यंत सात वर्षे सहाय्यक आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम. अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये हायकोर्टात बाजू मांडली.

Justice Vipul Pancholi | Sarkarnama

CJI ची संधी

न्यायमूर्ती पांचोली यांना सुप्रीम कोर्टात बढती मिळाल्यास 2031 ते 2033 या कालावधीत ते सरन्यायाधीश होऊ शकतात. जवळपास दीड वर्षांचा कायर्काळ मिळू शकतो.

Justice Vipul Pancholi | Sarkarnama

NEXT : न्यायमुर्ती आफताब आलम यांच्या कृपेने..! अमित शहांच्या जामीनावर 2 वर्षे सुनावणी, काय घडलं?

येथे क्लिक करा.