सरकारनामा ब्यूरो
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, यामध्ये अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवीन IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपैकी एक नाव आहे मधुराणी तेवतिया यांचे.
2008 च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या मधु राणी यांची नियुक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सचिव म्हणून करण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल..
होमिओपॅथिक डॉक्टर असलेल्या मधु राणी यांनी व्यवस्थापन शाखेतूनही पदवी मिळवली आहे. 2008ला त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या.
2009 ला त्यांचे लग्न IPS अधिकारी नरेंद्र सिंग यांच्याशी झाले. 2012 मध्ये मोरेना येथे झालेल्या स्थानिक खाण माफिया प्रकरणात त्यांच्या पतीची हत्या झाल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले.
पतीच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली या मागणीला आणि त्यांचे मध्य प्रदेश केडर बदलाच्या मागणीला परवानगी देण्यात आली होती.
मधु राणी तेवतिया यांची बदली अरुणाचल प्रदेश-गोवा-मिजोरम आणि केंद्र शासित प्रदेश (एजीएमयूटी) मध्ये करण्यात आली.
त्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.