Annapurna Singh : शेतकऱ्याच्या पोरीनं घडवला इतिहास; IAS बनत तिनं गावाचं नाव देशात पोहचवलं...

सरकारनामा ब्यूरो

अन्नपूर्णा सिंह

शेतकऱ्याच्या पोरीने इतिहास घडवला आहे. UPSC परीक्षेत 99 वा क्रमांकासह IAS बनत अन्नपूर्णा सिंह यांनी अख्या गावाचे नाव देशभरात पोहचवलं आहे.

Annapurna Singh | Sarkarnama

बाका जिल्ह्याच्या रहिवासी

बिहार येथील बाका जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या अन्नपूर्णा सिंह यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे.

Annapurna Singh | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पटना येथून पूर्ण केले असून उच्च शिक्षणासाठी बेंगळूरला येत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची डिग्री मिळवली.

Annapurna Singh | Sarkarnama

नोकरी

डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत नोकरी केली. नोकरी करत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

Annapurna Singh | Sarkarnama

राज्यात निवड

नोकरी करत असतानाच अन्नपूर्णा यांनी सुरूवातीला बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले होते.

Annapurna Singh | Sarkarnama

99 वा रँक

बिहार सेवेत न जाता त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करत राहिल्या. अखेर 2023 मध्ये दुसऱ्या प्रयत्नांत त्यांना यश मिळाले. त्यांनी संपूर्ण देशातून 99 वा रँक मिळवला.

Annapurna Singh | Sarkarnama

भारतीय वन सेवा

रँकनुसार त्यांची निवड भारतीय वन सेवे (IFS) साठी करण्यात आली. सध्या त्या प्रशिक्षण घेत आहेत.

Annapurna Singh | Sarkarnama

मुलाखतीमुळे टॉप रँकमध्ये स्थान

अन्नपूर्णा सांगतात की, मुलाखतीत मिळालेल्या गुणांमुळे त्यांना UPSC मध्ये टॉप100 रँकमध्ये स्थान मिळाले.

Annapurna Singh | Sarkarnama

NEXT : धडधडणाऱ्या हृदयाचं 35 मिनिटांचं 'एअरलिफ्ट' मिशन; मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याची जबरदस्त स्टोरी

येथे क्लिक करा...