सरकारनामा ब्यूरो
हरियाणाच्या खेडा गावातील अरविंद केजरीवाल यांनी IIT खरगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुमारे 3 वर्षे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली.
नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. IRS मध्ये निवड झाल्यानंतर त्यांची आयकर विभागात सहायक आयुक्त पदावर नियुक्ती झाली.
उच्च शिक्षणासाठी पगारी रजा घेतली. कालांतराने 2006 मध्ये नवी दिल्लीतील आयकर आयुक्त पदाचा त्यांनी राजीनामा दिला.
2006 मध्ये भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
2011 मध्ये अण्णा हजारे यांच्यासमवेत जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीची मागणी करत इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप (IAC) ची स्थापना केली.
अण्णा हजारे यांनी भरवलेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली तेव्हापासून आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून केजरीवाल पुढे आले.
2012 रोजी त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) ची स्थापना केली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
2015 च्या निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी विधानसभेत पोहोचली. 2020 च्या निवडणुकीतही विजय मिळवत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
R