सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी पीएम मोदी हे भूतानच्या पारो या ठिकाणी गेले आहेत.
खराब हवामानामुळे हा दौरा पुढे ढकलल्यानंतर अखेर मुहूर्त साधत ते तिथे पोहोचले.
भूतानच्या विमानतळावर त्यांचे गार्ड ऑफ ऑनरसह जोरदार स्वागत करण्यात आले.
2021 मध्ये जाहीर झालेला भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो मोदींना दिला जाईल.
पुरस्कार जाहीर झाल्यापासून पंतप्रधानांची या ठिकाणी ही पहिलीच भेट आहे.
भारत-भूतान संबंध मजबूत करण्यासाठी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी हा प्रयत्न केला आहे.
कोविड-19 दरम्यान भारताने केलेल्या 500,000 डोसच्या तरतुदीबद्दल कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
R