Rajanand More
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता विराजमान झाल्या. त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित होते.
गुप्ता यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. सर्वच आमदार मातब्बर असून काही जण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही होते.
रेखा गुप्ता यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शपथ घेतलेले परवेश वर्मा यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे होते. ते दोनवेळा खासदार होते. तसेच वडीलही मुख्यमंत्री होते. प्रचारादरम्यानही त्यांच्या नावाची चर्चा.
भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये ते मंत्री होते. सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत ते पक्षातून बाहेर पडले आणि 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
पहिल्यांदाच आमदारकी मिळाल्यानंतर मंत्रिपदी वर्णी लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संंबंध. एबीव्हीपीतून राजकारणाची सुरूवात. दिल्लीतील भाजपचा पंजाबी चेहरा म्हणून ओळख.
पूर्वांचली ठाकूर असलेल्या पंकज कुमार सिंह पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. पुर्वांचली मते भाजपकडे खेचण्यात सर्वात मोठा त्यांचा वाटा होता. त्यामुळे भाजपकडून मंत्रिपदाचे बक्षिस.
मंत्रिमंडळात जातीय समीकरण साधण्यासाठी दलित समाजातील इंद्रराज यांना संधी देण्यात आली आहे. तेही पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत.
दिल्ली विधानसभेतील ज्येष्ठ आमदार आहेत. ते शिरोमणी अकाली दलाचे नेते होते. चारवेळा आमदार राहिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पाचव्यांचा आमदारकी मिळवली. भाजपकडून मंत्रिपदाचे बक्षिस.