सरकारनामा ब्यूरो
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता या कोट्यधीश आहेत. जाणून घेऊयात त्यांची एकूण संपत्ती किती आहे?
रेखा गुप्ता या वकील आहेत. त्यांचे पती मनीष गुप्ता हे कोटक लाइफ इन्शुरन्स एजन्सी असोसिएट आणि निकुंज एंटरप्रायझेसचे मालक आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती 5.31 कोटी रुपये इतकी आहे, तर 1.20 कोटी रुपयांची देणी आहेत.
रेखा गुप्ता यांच्याकडे एकूण 1,48,000 रुपयांची रोकड आहे, तर त्यांचे पती मनीष गुप्ता यांच्याकडे 1,57,000 रुपये रोख रक्कम आहे.
रेखा गुप्ता यांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. यात SBI बँकेत 20.81 लाख रुपये, केशव सहकारी बँकेत 5 हजार 800 सत्त्याहत्तर रुपये आणि SBIच्या PPF खात्यात एकूण 1.42 लाख रुपये इतकी रक्कम आहे.
गुप्ता यांच्याकडे 2020 मॉडेलची मारुती XL6 कार आहे, ज्याची अंदाजे किंमत 4.33 लाख रुपये आहे.
पती-पत्नीकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 3.50 कोटी रुपये आहे. या संपत्तीमध्ये दिल्लीतील बंगला आणि व्यावसायिक मालमत्तेचा समावेश आहे
पती मनीष यांचे एसबीआय नॉर्थ पीतमपुरा या शाखेत 46.41लाख रुपये आणि आयसीआयसीआय बँक शालीमार बाग शाखेत 2.11 लाख रुपये आहेत.