सरकारनामा ब्यूरो
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दणकावून पराभव करत. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. पक्ष बदलून निवडणूक लढवत काही उमेदवार जिंकून आले आहेत.
यात पहिल्यांदा नाव येते ते म्हणजे कैलाश गेहलोत यांचे. आप आदमी पक्षाला सोडून जात बिजवासन या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली आहे. गेहलोत यांचा विजय हा केजरीवालांसाठी हा मोठे अपयश मानले जात आहेत.
गांधीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर अनेकवेळा निवडणूक लढवलेले अरविंद सिंग लवली हे यावेळी 'आप'मध्ये दाखल होत आणि विजयी झाले. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले नीरज बसोया हे कस्तुरबा नगरमधून विजयी झाले आहेत.
प्रवेश रतन यांनी भाजप पक्षातून माघार घेत आपच्या तिकिटावर पटेलनगर येथून विजयाचा गुलाल उधळला.
सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून आपच्या जुबैर चौधरी यांनी भाजप उमेदवाराचा 42 हजार 477 इतक्या मतांनी पराभव केला आहे.
अनिल झा यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत 'आप'मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी किराडी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राजकुमार चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मंगोलपूरीतून विजयाचा गुलाल उधळला आहे.
आम आदमी पार्टीला सोडून भाजपमध्ये दाखल झालेले करतार सिंह तंवर हे छतरपूर येथून विजयी झाले आहेत. याआधीही त्यांच्याकडे ही जागा होती.