Pradeep Pendhare
संविधानामध्ये दुरुस्ती करत 'इंडिया'ऐवजी 'भारत' किंवा 'हिंदुस्थान' हा शब्द वापरण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यासाठी याचिका.
'इंडिया' नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करत नसल्याने नाव बदलून 'भारत' किंवा 'हिंदुस्थान' करण्यात यावे.
'इंडिया' नाव बदल्यास नागरिकांना डोक्यावरील ‘वसाहतवादी’ देशाचे ओझे कमी होईल, असा याचिकेत दावा.
संविधानातील कलम 1 मध्ये दुरुस्ती करून 'इंडिया' हा शब्द हटवावा. तिथं सुधारणा करून 'भारत' किंवा 'हिंदुस्थान' शब्द वापरण्याचे निर्देश द्यावेत.
1948 मध्ये तत्कालिन संविधानाच्या मसुद्यातील कलम 1 आणि संविधान सभेत झालेल्या चर्चेचा उल्लेख याचिकेत आहे.
देशाला त्याच्या मूळ अर्थात भारत नावाने ओळखण्याची वेळ आली आहे.
हिंदुस्थानी संस्कृतीला अनुरुप अनेक शहरांची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे देशाचे नाव देखील बदलले पाहिजे.
दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ दिली असून पुढील सुनावणी 12 मार्च होईल.