Mayur Ratnaparkhe
कमाल खान हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आहे.
याशिवाय 'देशद्रोही' चित्रपट फेम अभिनेता म्हणूनही त्याला ओळखलं जातं.
कमाल खान हा ट्विटरवर कायम वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत असतो.
याशिवाय अभिनेते आणि अभिनेत्रींवर केलेल्या विविध टीकांसाठीही तो बदनाम आहे.
कमाल खान याने आतापर्यंत अनेक चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते अन् अभिनेत्रींची सोशल मीडियावर टर उडवलेली आहे.
आता कमाल खान याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे.
त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून सर्वच स्तरातून त्याच्यावर जोरदार टीका सुरू आहे.
विकीपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खानने पोस्ट केली होती.
यानंतर तो विकीपीडियावरील मजकूरही हटवण्याची सर्वस्तरातून मागणी होवू लागली.