Rajanand More
दिल्लीतील कोर्टाने मद्य धोरणा घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यामध्ये एका महिला आमदाराचेही नाव आहे.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आमदार असलेल्या कन्या के. कविता यांनाही क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यांच्या शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता.
कविता यांनी ईडीने मार्च २०२४ मध्ये अटक केली होती. त्यांना सुप्रीम कोर्टाने पाच महिने तुरूंगात काढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात जामीन मंजूर केला होता.
तपास यंत्रणांनी मद्य धोरणासाठी शंभर कोटींची लाच दिल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये कविता यांना आरोपी करण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यांनी पक्षातील नेत्यांवरच आपल्या वडिलांना टार्गेट केले जात असल्याचे आरोप केले होते.
केसीआर यांनी मागीलवर्षी कविता यांचीच पक्षातून हकालपट्टी केल्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांचे राजकीय करिअर पणाला लागले होते.
कविता यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने आता कविता यांचे बळ वाढले आहे. त्या पुढील काही दिवसांत नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून वडिलांच्या पक्षाविरोधात शड्डू ठोकण्याची शक्यता आहे.