Rajanand More
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर.
लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी कोर्टाकडून केजरीवालांना दिलासा दिला. त्यांना 1 जूनपर्यंत 21 दिवस प्रचार करता येईल.
दिल्लीसह पंजाब, हरियाणामध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार. चार टप्प्यांमध्ये तीन राज्यांत प्रचाराची रणधुमाळी.
कोर्टाने जामीन देताना पाच महत्वाच्या अटी घातल्या आहेत. त्या अटींचे पालन केजरीवालांना प्रचारादरम्यान करावे लागेल.
मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाता येणार नाही. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.
नायब तहसीलदार व्ही. के. सक्सेना यांच्याकडून मान्यतेसाठी गरजेचे असल्याशिवाय कोणत्याही सरकारी फाईलवर सही करता येणार नाही.
घोटाळ्यातील सहभागाबाबत बोलण्यावरही बंधन. या प्रकरणी त्यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
केजरीवालांना घोटाळ्याशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क किंवा संवाद साधता येणार नाही.
घोटाळ्याशी संबंधित कोणतीही सरकारी फाईल हाताळता येणार नाही, अशी अटही कोर्टाने घातली आहे.