Mangesh Mahale
राजधानी दिल्लीत महाराष्ट्रात भवनात गेले तीन दिवस महाराष्ट्र खाद्य महोत्सव –2025 आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण खाद्य संस्कृतीचा खमंग दरवळ दिल्लीकरांना मोहित करुन टाकत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांना राष्ट्रीय स्तरावरही व्यासपीठ मिळाले. 'उमेद' (MSRLM) योजनेअंतर्गत हा महोत्वव झाला.
महोत्सवात कोकणातील मालवणी सीफूड
कोल्हापूरचा तिखट तांबडा-पांढरा रस्सा
विदर्भातील झणझणीत सावजी मटण रस्सा
खानदेशातील खापरावरची पुरणपोळी, वांग्याचे भरीत आणि शेव भाजी यांसारख्या पदार्थांनी मोठी गर्दी खेचली.