नेतेगिरी भोवली, आंदोलन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

Rajanand More

ACP निलंबित

दिल्ली पोलीस दलातील एसीपी मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

काय घडलं?

दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर सोमवारी (ता. २) अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. मनस्वी वशिष्ठ हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

आधी बदली

दिल्ली पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी एसीपी वशिष्ठ यांची बदली केली होती. ते गांधी नगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासह शाहदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसएचओ निरीक्षक अरुण कुमार यांचीही बदली झाली होती.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

कारण काय?

काही दिवसांपूर्वी शाहदरा पोलीस ठाण्यात काही वकिलांना मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर होता. वकील संघटनांच्या आंदोलनानंतर वशिष्ठ आणि अरुण कुमार यांची बदली झाली.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

आंदोलन

बदली विरोधात वशिष्ठ यांनी पोलीस मुख्यालयासमोरच आंदोलन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आता निलंबनाची कारवाई.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

कोण आहेत ACP?

मनस्वी वशिष्ठ हे DANP पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. DANP म्हणजे दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली पोलीस सेवा.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

पाच मागण्या

आंदोलक पोलिसांनी पोलीस आयुक्तांकडे पाच मागण्या केल्या. त्यामध्ये वकिलांवर कारवाईसह एफआयआरमध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचा त्यात समावेश आहे.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

संघर्ष वाढणार?

वशिष्ठ यांच्या आंदोलनामुळे पोलीस आणि वकिलांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस दलात नाराजीची चर्चा आहे.

ACP Manasvi Vashist | Sarkarnama

NEXT : केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या नावे स्वित्झर्लंडमध्ये 34 कोटींचे अपार्टमेंट; पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ?

येथे क्लिक करा.