केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या नावे स्वित्झर्लंडमध्ये 34 कोटींचे अपार्टमेंट; पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ?

Rajanand More

हरदीप सिंग पुरी

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी कुटुंबाच्या संपत्तीची माहिती दिली आहे.

Cabinet Minister Hardeep Puri | Sarkarnama

पत्नीकडे अधिक संपत्ती

पुरी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांची वार्षिक कमाई, मालमत्ता पतीपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. पुरी यांच्या पत्नीच्या नावे स्वित्झर्लंडमध्ये तब्बल ३४ कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.

Hardeep Puri, Lakshmi Puri | Sarkarnama

एकूण किती?

लक्ष्मी पुरी यांच्याकडे १० कोटी ६६ लाख रुपयांची चल तर ९ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यामध्ये घरांच्या संपत्तीची माहिती नाही. स्वित्झर्लंडमधील अपार्टमेंटसह ग्रेटर नोएडा येथे १९ लाख ५२ हजार रुपयांचे घरही आहे.

Lakshmi Puri | Sarkarnama

अमेरिकी डॉलर

केंद्रीय मंत्र्‍यांच्या पत्नीकडे २ लाख ९० हजार ६५८ अमेरिकी डॉलर असून त्याचे रुपयांमध्ये २ कोटी ७५ लाख एवढे मूल्य आहे. मागील पाच वर्षांतील कमाई १ कोटी ६९ लाखांनी वाढली आहे.

dollar

कुठून कमाई?

लक्ष्मी पुरी यांना केंद्र सरकार, संयुक्त राष्ट्र यांच्याकडून पेन्शन मिळते. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमधील घराचे भाडे, बँक सेव्हिंगचे व्याज मिळते.

Hardeep Puri, Lakshmi Puri | Sarkarnama

IFS अधिकारी

भारतीय परराष्ट्र सेवेत अनेक वर्षे अधिकारी म्हणून लक्ष्मी पुरी यांनी सेवा बजावली आहे. संयुक्त राष्ट्रमध्येही त्या अधिकारी होत्या.

Lakshmi Puri | Sarkarnama

मंत्र्‍यांकडे किती संपत्ती?

हरदीप पुरी यांच्याकडे ६ कोटी ५४ लाख रुपयांची चल तर २० कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत त्यांची वार्षिक कमाई ६३ लाख ३६ हजारांहून वाढून ७५ लाख ५७ हजारांवर पोहोचली आहे.

Hardeep Puri, Lakshmi Puri | Sarkarnama

एकही गुन्हा नाही

केंद्रीय मंत्र्‍यांच्या विरोधात एकाही फौजदारी गुन्हा नोंद नाही किंवा प्रकरण प्रलंबित नाही. त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकरणात दोषीही ठरविण्यात आलेले नाही, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Cabinet Minister Hardeep Puri | Sarkarnama

NEXT : पतीच्या हत्येनंतर राजकारणात, आता बड्या नेत्याच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नाव

येथे क्लिक करा.