Rajanand More
दिल्ली पोलीस दलातील ACP दर्जाचे अधिकारी विवेक भगत यांचे केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी (ता. ६) रात्री अतिरिक्त उपायुक्त या पदावर पदोन्नती दिली. पण त्यानंतर काही तासांतच हे प्रमोशन थांबविण्यात आले.
मिडिया रिपोर्टनुसार भगत यांनी स्वत:हून पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत हे प्रमोशन थांबविण्याची विनंती केली होती. यामागे त्यांनी महत्वाचे कारण दिले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान आपला विनयभंग केल्याची तक्रार तीन महिला पत्रकारांनी केली आहे. या प्रकरणी भगत यांच्यावरही आरोपही आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच कारणाने त्यांनी प्रमोशन नाकारले.
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात भगत हेही तिथे तैनात होत्या. यावेळी त्यांनाही दुखापत झाली होती. त्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. आता पुन्हा जंतरमंतर कारणीभूत ठरले आहे.
भगत हे एसीपी दर्जाचे अधिकारी असून सध्या ते दिल्ली पोलीस दलात कॅनॉट प्लेसचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
भगत हे मुळचे दिल्लीचे असून DANIPS केडरचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून २०१९ मध्ये सेवेत प्रवेश केला आहे.
DANIPS म्हणजे दिल्ली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली पोलीस सेवा) असा आहे. ही भारताच्या केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्यरत असलेली एक केंद्रीय नागरी पोलीस सेवा आहे.
IPS साठी 'फीडर केडर' म्हणून DANIPS ही सेवा काम करते. या सेवेत ठराविक वर्षे काम केल्यानंतर उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर संबंधित अधिकाऱ्यांना IPS म्हणून पदोन्नती मिळते.