Rajanand More
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी १३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी तीन जागांवर निवडणूक झाली असून भाजपचा विजय झाला आहे.
भाजपने कोयल मल्लिक यांना एका जागेवरील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्या बंगालमधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत.
कोयल यांनी जुलै महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांनी ६ एप्रिल रोजी खासदारकीची शपथ घेतली होती.
कोयल या पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून राज्यसभेत गेल्या होत्या. केवळ १०१ दिवसच त्या सदस्य होत्या. राज्यसभेत एकही दिवस न घालविता त्यांनी राजीनामा दिला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता गेली. त्यानंतर अनेक नेते पक्षाला सोडून गेले. त्यामध्ये कोयल यांचेही नाव आहे.
कोयल या राजीनामा देणाऱ्या राज्यसभेच्या चौथ्या खासदार होत्या. त्यांच्याआधी तीन खासदारांनी राजीनामा दिला होता.
राजीनामा दिलेल्या यापूर्वीच्या तीन खासदारांना भाजपने तिकीट देत पुन्हा राज्यसभेवर पाठविले आहे. आता कोयल यांचाही विजयही निश्चित आहे.
कोयल यांचे खरे नाव रुक्मिणी असून टॉली क्वीन म्हणून त्यांना टॉलीवूडमध्ये ओळखले जाते. २००३ मध्ये या क्षेत्रात पदार्पण. ज्येष्ठ अभिनेते रंजीत मल्लिक यांच्या कन्या आहेत.