Rajanand More
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत जोसलीन नंदिता चौधरी या काँग्रेस प्रणित ‘एनएसयूआय’च्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या.
जोसलीन यांचा जवळपास 16 हजार मतांनी दारूण पराभव झाला आहे. एबीव्हीपीचे उमेदवार आर्यन मान यांनी त्यांचा पराभव केला.
विद्यापीठाच्या निवडणुकीत तब्बल 17 वर्षानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला उमेदवाराला संधी मिळाली होती. जोसलीन यांनी जोरदार प्रचार करत महिलांची ताकद दाखवून दिली.
पराभवानंतर त्यांना अनेकांनी सोशल मीडियात ट्रोल केले आहे. सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स पण निवडणुकीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये केवळ 349 मते, असे म्हणत ट्रोल केले जात आहे.
त्यांच्या नावावरूनही चर्चा सुरू आहेत. शाळेत त्यांचे नाव जीतू चौधरी होते. ते जोसलीन कसे झाले, असा प्रश्न सोशल मीडियात उपस्थित केले जात आहेत.
जोसलीन या मुळच्या राजस्थानच्या असून शेतकरी कुटुंबातील आहेत. 2019 पासून त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत.
जोसलीन या 23 वर्षांच्या असून विद्यापीठात बुध्दिस्ट स्टडीज शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहेत.
निवडणुकीच्या प्रचारमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या मांडत विद्यार्थी केंद्रीत प्रचार केला होता. पण एनएसयूआयमधील गटबाजीमुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.