सरकारनामा ब्यूरो
अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने 7 जानेवारीला निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या.
5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या एक दिवस आधी दिल्लीतील मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर केली होती.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
2013 पासून दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता आहे.
सलग तिसऱ्यांदा आप दिल्लीची सत्ता काबीज करणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.
या यादीत पुरुष मतदारांची संख्या 83. 49 लाख आहे. तर महिला मतदारांची संख्या 71.73 लाख असून तृतीयपंथाची संख्या 1,261 इतकी आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिल्लीतील 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदार ठरवणार राज्यात कोणाची सत्ता येणार.