सरकारनामा ब्यूरो
राजेश कुमार वर्मा यांनी मंगळवार (ता.7) ला इंदू दुबे यांच्याकडून पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) या पदाचा स्वीकार केला.
1993 च्या बॅचचे ते इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिसेस (IRSS) चे अधिकारी आहेत.
त्यांनी IIT दिल्ली येथून सिविल इंजिनियरिगंची पदवी मिळवली. मृदा आणि फाउंडेशन अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवली आहे. त्यांनी ICLIF (मलेशिया) आणि INSEAD (सिंगापूर) येथून प्रगत व्यवस्थापन या विषयात पदवी घेतली आहे.
(DRM) या पदावरील येण्याआधी ते उत्तर रेल्वेमध्ये मुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
वर्मा यांनी उत्तर रेल्वे (NR), दक्षिण मध्य रेल्वे(SCR), उत्तर पुर्व रेल्वे (NER),रेल्वे कोच फॅक्टरी युनिट्स (RCF) त्याचबरेबर रेल्वे इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अशा विभागात महत्वाची कामगिरी केली आहे.
रिट्स लिमिटेड (RITES Ltd) या इंजिनियरिग क्षेत्रातील प्रमुख कंपनीत त्यांना टीम लिडर म्हणून काम केले आहे.
वर्मा यांना वेअरहाऊस आणि सप्लाय-चेनमधील म्हत्वाच्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट महाव्यवस्थापकांकडून पुरस्कार देण्यात आला आहे.