Rajanand More
इंडिया आघाडीच्या वोट चोरीच्या आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाघ यांना भोवळ आली. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या खासदार सायोनी घोष धावून गेल्या.
पोलिसांनी सर्व खासदारांना बसमध्ये बसविले होते. तिथेच मिताली यांची तब्येत बिघडली. त्यावेळी प्रियांका गांधी आणि सायोनी घोषही होत्या.
मिताली बाघ या आंदोलनादरम्यान अत्यंत आक्रमक होत्या. त्या पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढून आंदोलन करत होत्या. त्यानंतर काहीवेळात त्यांना भोवळ आली होती.
सुरूवातीला सायोनी घोष यांच्यासह समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी बाघ यांना आधार दिला. दोघांनी रस्त्यावर बसून त्यांना मदत केली.
खासदार बाघ या बेशुध्द पडल्यानंतर खासदारांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती. घोष आणि सरोज यांनी मोर्चा सांभाळला.
महिला खासदार बेशुध्द पडल्याचे समजताच राहुल गांधीही तातडीने मदतीला धावून गेले. परिस्थितीचे भान राखत त्यांनी बाघ यांनी रुग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या.
राहुल यांनी इतर खासदारांच्या मदतीने मिताली बाघ यांनी गाडीपर्यंत नेले. त्यांना गाडीत बसविले, तब्बेतीची विचारपूस करून रुग्णालयात पाठविले.
राहुल गांधी यांच्यासह सायोनी घोष यांच्या या कृतीचे इतर सर्व खासदारांनीही कौतुक केले. कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतल्याची चर्चा सोशल मीडियात आहे. फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.