Roshan More
लोकसभेच्या जागा 50% वाढणार
डिलिमिटेशननंतर खासदारांची संख्या वाढण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सोमवारी लोकसभेत मतदान होणार आहे. या घटनादुरुस्ती विधेयकानुसार लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ होणार आहे.
सध्या लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे प्रस्तावित जागा अंदाजे 816 ते 824 होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत बहुमतासाठी एकूण सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा एक जागा अधिक आवश्यक असते. 816 जागा असल्यास बहुमत 409 आणि 824 जागा असल्यास बहुमत 413 असेल,
सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) 84 जागा राखीव आहेत. 50 टक्के वाढीच्या प्रमाणात गणित मांडल्यास अंदाजे 126 जागा होऊ शकतात.
सध्या अनुसूचित जमातींसाठी (ST) 47 जागा राखीव आहेत. 50 टक्के वाढीच्या प्रमाणात अंदाजे 70 ते 71 जागा होऊ शकतात. मात्र ही आकडेवारी अंतिम नाही. जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा नेमकी संख्या किती हे कळेल
केंद्र सरकारने 50 टक्के जागावाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र संसदेची मंजुरी, कायद्यातील बदल आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.
हे बिल मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची म्हणजे 360 खासदारांच्या पाठींब्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात 72 खासदार? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला किती जागा मिळणार?