महाराष्ट्रात 72 खासदार? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला किती जागा मिळणार?

Pradeep Pendhare

24 नव्या जागा?

महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या 48 जागा आहेत. प्रस्तावित 50 टक्के वाढीनुसार जागा 72 होऊ शकतात. म्हणजेच 24 जागांची वाढ!

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

राजकीय नकाशा बदलणार!

नव्या जागा निर्माण करताना मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखल्या जाऊ शकतात. काही गावं, तालुके किंवा शहरं सध्याच्या मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांतील प्रतिनिधित्वाचे गणित बदलू शकते. लोकसंख्या आणि परिसीमनाच्या निकषांनुसार नव्या मतदारसंघांची रचना ठरेल.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

विदर्भात नवे मतदारसंघ

नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम परिसरातील मतदारसंघांची संख्या किंवा सीमा बदलू शकते.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

मराठवाड्याचे प्रतिनिधित्व

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागांमध्ये नव्या मतदारसंघांची शक्यता चर्चेत येऊ शकते.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र समीकरण?

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील मतदारसंघांचे सीमांकन बदलू शकते. अहिल्यानगरला तिसरा लोकसभा मतदारसंघ मिळणार का, हा मुद्दा चर्चेत आहे.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

मुंबई, ठाणे अन् कोकण

मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि शहरी विस्तारामुळे मतदारसंघांच्या सीमा बदलतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागातील प्रतिनिधित्वाचे नवीन गणित ठरू शकते.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

महिला आरक्षणही?

महिला आरक्षणाच्या 33 टक्के तरतुदीचा प्रस्तावित जागावाढीशी संबंध आहे. महाराष्ट्रात 72 जागा झाल्यास जवळपास 24 जागा महिलांसाठी राखीव होण्याचे गणित मांडले जात आहे.

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

नवा खासदार

अंतिम जागावाटप आणि मतदारसंघांची सीमा परिसीमन प्रक्रियेनंतर नवीन खासदार स्पष्ट होईल. तुमच्या जिल्ह्याला नवा लोकसभा मतदारसंघ मिळावा, असे तुम्हाला वाटते का?

Maharashtra Lok Sabha seats | Sarkarnama

NEXT : महिला आरक्षणामुळे खासदारांचे मतदारसंघ जाणार?

येथे क्लिक करा :