Aslam Shanedivan
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून अनेक शहरांच्या नामांतरनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात राजधानी दिल्लीतील औरंगजेब रोडचा समावेश असून माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच बेंगलोरचं नाव बदलून बेंगळुरू करण्यात आलं आहे.
तसेच राज्यातील सुमारे आठ शहरांची नावे देखील बदलण्यात आली असून यात अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादचाही समावेश आहे
आता नव्याने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची मागणी होत असून याचा निर्णय लवकरच होऊ शकतो
दरम्यान याच्याआधी बॉम्बे या शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले आहे. तर कल्याण नाव बदलण्याची चर्चा सध्या सुरू आहे
राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या शहरांसह जिल्ह्यांच्या नावात बदल करण्यात आला असून ती अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर असे करण्यात आली आहेत.
तसेच यापूर्वी चांदा असे नाव असणाऱ्या शहराचे नाव आता बदलून चंद्रपूर करण्यात आले आहे.
राज्यातील काही शहरांच्या नावात बदल करण्यात आल्यानंतर आता मालेगाव (नाशिक) आणि मीरा-भाईंदर (ठाणे) या शहरांच्या नावात बदल करण्याची मागणी होत आहे.