Sharad Pawar : शेतकऱ्याने शरद पवारांना भेट दिला 3 किलोचा 'शरद मॅंगो', पाहा फोटो...

Ganesh Sonawane

शरद पवार भारावले

सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शरद पवार यांची भेट घेत त्यांना आंबे भेट दिले. या आंब्याचे नाव व वैशिष्ट ऐकुन शरद पवार भारावून गेले.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

पवारांनी स्वत: फोटो पोस्ट केले

शरद पवार यांनी स्वत:फेसबुकवर फोटो पोस्ट करुन या आंब्याची माहिती दिली. फळांचा राजा असलेला आंबा आपला गोडवा टिकवून प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं असं शरद पवार यांनी पोस्ट केलं आहे.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

एकच आंबा तीन किलोचा

हा एकच आंबा तब्बल तीन किलोचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी शरद पवारांना हा आंबा भेट दिला. त्यांनी या आंब्याच्या वाणाला 'शरद मँगो' असं नाव दिलं आहे.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

आंब्याची खासियत

या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचे वजनच नाही, तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे. गाडगे यांनी केसर, झाडी, केला अशा विविध आंबा प्रजातींचं ग्राफ्टिंग करून हे वाण विकसित केलं आहे.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

फळबाग योजना

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रेय गाडगे यांनी आंबाच्या प्रयोगाला सुरुवात केली.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

आठ एकर जमिनीवर लागवड

गाडगे यांनी त्यांच्या आठ एकर जमिनीवर सुमारे दहा हजार केशर आणि आंब्याची झुडुपे लावली होती. नंतर, त्यांनी आणखी बदल केले आणि 'शरद आंबा' ही नवीन अंब्याची जात तयार केली.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

देशभरातील ओखळ

दत्तात्रय गाडगे यांना खात्री आहे की, शरद मॅंगो भविष्यात महाराष्ट्राचाच नाही तर देशभरातील ओखळ बनू शकतो.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

...म्हणून शरद पवारांचे नाव

शरद पवार यांनी सुरु केलेल्या योजनांमुळेच आज त्यांना हे यश मिळालं आणि म्हणूनच त्यांना या आंब्याचे नाव देखील शरद पवार यांच्या नावावरुन ठेवलं आहे.

farmerDattatray Ghadge gifts 3 kg mango to Sharad Pawar | Sarkarnama

NEXT : अवघ्या 26 व्या वर्षी एका सिद्धांताने जयंत नारळीकर विज्ञानजगताचा चेहराच बनले!

Jayant Narlikar death | Sarkarnama
येथे क्लिक करा