Aslam Shanedivan
महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
बीड रेल्वे याआधी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड जिल्ह्याला रेल्वेने जोडण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे
तर दुसरीकडे पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठी राज्य सरकारने निधीला मंजुरी दिली आहे.
बीड जिल्ह्याला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर (अहमदनगर) या रेल्वे मार्गावर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच अजित पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
तसेच पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिलीय.
या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 5,100 कोटी रुपये असून, यात जमीन अधिग्रहणाचा खर्चही समाविष्ट आहे.