सरकारनामा ब्यूरो
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
सकाळच्या वेळी त्यांनी कोल्हापूरातील गंगावेश तालमीला भेट दिली.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी शाहू महाराजांची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.
मल्लांची व वस्तादांची व्यवस्था, तसेच अन्य व्यवस्थेसह तेथील परिसराची त्यांनी पाहणी केली.
तालमीच्या पाहणीनंतर त्यांनी वस्ताद व मल्लांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.
तालीमचा विकास करण्यासाठी सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारा आराखडा सादर करा, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली.
तालमीच्या नूतनीकरणाबरोबर प्रशिक्षण घेत असलेल्या मल्लांच्या शिक्षण व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.
हेरीटेज टच ठेवून, २०० मल्लांची राहण्याची व्यवस्थेबरोबर त्या जागेतील वृक्षतोड होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिली.