Vijaykumar Dudhale
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या संवर्धन करण्यात आलेल्या जुन्या इमारतीची पाहणी करून त्याबद्दल प्रशासनाचे कौतुकही केले.
सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र (मिलेट सेंटर) बारामती हलविण्यात आलेले नाही. दुसऱ्याचं पळवून नेणं, माझ्या रक्तात नाही, असे सांगून त्यासंदर्भातील शासकीय परिपत्रकामध्ये सोमवारी दुरुस्ती करण्याबाबतचे सूतोवाचही त्यांनी केले.
उजनी धरण ते सोलापूर जलवाहिनीसाठी 350 कोटी रुपये निधी देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. या कामात अडथळे आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अजित पवार यांनी आजच्या दौऱ्यात सोलापूर जिल्हा, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
अजित पवार यांच्या उपस्थितीत इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील आणि सोलापुरातील काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दम भरला. पदे ही फक्त मिरवायला नाही तर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आहेत, हे कायम लक्षात ठेवा, असेही सुनावले.
सोलापुरातील एका मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी पूनम पांडे हिच्या मृत्यूचा उल्लेख केला. मात्र, तो स्टंट असल्याचे उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसल्याने त्याची चर्चा रंगली होती.
राहुल गांधींचे ‘तुजवीण शंभो मज कोण तारी..’