Sachin Deshpande
झारखंडच्या देवघर येथे बाबा बैद्यनाथ मंदिरात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दर्शन घेतले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या 21व्या दिवशी झारखंड येथे पोहचले राहुल गांधी. त्यानंतर पोहोचले बैद्यनाथ मंदिरात.
बाबा बैद्यनाथ यांच्या शिवलिंगाचे घेतले दर्शन घेत राहुल गांधी यांनी जलाभिषेक केला.
राहुल गांधी यांनी शिवमंदिरात कपाळावर त्रिपुंड्र आणि तिलकही करून घेतला. ते सोवळ्यातही दिसले.
राहुल गांधी यांच्या हस्ते मंदिरात पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी पिवळा पुष्पहार बाबा बैद्यनाथला अर्पण केला. प्रसादही चढवला.
राहुल गांधी हे एकटेच गाभाऱ्यात होते. यावेळी पुरोहित्यांनी त्यांना पूजनासंदर्भात मार्गदर्शन केले.
अभिषेकादरम्यान श्रीरूद्राचे आणि श्रीसुक्ताचे पाठ करण्यात आले. त्यातून शिव आणि शक्ती दोघांचीही आराधना करण्यात आली.
देशात लोकसभा निवडणूक लवकरच होणार आहे. अशात राहुल गांधी यांनी कदाचित महादेवाला तुजविण शंभो मज कोण तारी.. अशी तर प्रार्थना केली नाही ना?