MPSC Exam : एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीतही होणार : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Vijaykumar Dudhale

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आता मराठीतून घेतल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. तामिळनाडूत भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे

MPSC Exam | Sarkarnama

मिलिंद नार्वेकरांचा प्रश्न

विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शेती आणि अभियांत्रिकीशी संबंधित काही परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. अभियांत्रिकीच्या परीक्षा मराठी भाषेत का घेतल्या जात नाहीत, असा प्रश्न विचारला होता.

Milind Narvekar | Sarkarnama

न्यायालयाचा निर्णय

देवेंद्र फडणवीस म्हणाले एमपीएससीच्या परीक्षा आधीच मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत घेतल्या जातात. पण, न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये असा निर्णय दिला होता की, काही विशिष्ट परीक्षा, विशेषतः कृषी अभियांत्रिकीशी संबंधित, फक्त इंग्रजीमध्येच घेतल्या पाहिजेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama

सरकारी पातळीवर चर्चा

जेव्हा हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आले, तेव्हा सरकारी पातळीवर याबाबतची चर्चा करण्यात आली.

MPSC Exam | Sarkarnama

पाठ्यपुस्तके मराठीत नाहीत

सरकारी पातळीवरील चर्चेत संबंधित विषयांची पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध नसल्याचे आढळून आले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि त्यांनी युक्तिवाद स्वीकारला.

MPSC Exam | sarkarnama

मराठी पुस्तके उपलब्ध करण्याचा प्रयत्न

तांत्रिक विषयांसाठी मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

MPSC Exam | Sarkarnama

अभियांत्रिकी अभ्यासक्रम आता मराठीत

राज्य सरकारने आता निर्णय घेतला आहे की, जरी सध्या पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध नसली तरी, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत चालवण्याची परवानगी आहे.

MPSC Exam | Sarkarnama

तब्बल 23 वेळी यशाची हुलकावणी, 24 व्या प्रयत्नात MPSC त चमकला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MPSC Success Story | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा