Pradeep Pendhare
बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान 28 जानेवारीला सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळलं.
सुरवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. अपघातावेळी बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता असल्याचं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अहवालात नमूद
उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं. परंतु बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका, अहवालात ठेवण्यात आला आहे.
बारामती विमानतळावर अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भिंत अपुरी असल्याचं 'AAIB'चं अहवालात निरीक्षण
पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रन-वे वर लँडिंग क्लिअरन्स, पायलटने 'Field in sight' कळवलं. अंतिम क्षणी कॉकपिटमधून 'Oh S**t…', असा आवाज अन् विमान रनवेच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळलं.
दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी सापडले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला
अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान, तरी फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड
काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार
अनियंत्रित एअरफिल्डवर VFR नियमांचे काटेकोर पालन व्हावे, हवामान निकष तंतोतंत पाळावेत, मूलभूत हवामान सुविधा व लँडिंग सहाय्य वाढवावे अन् एअरफिल्डचे परवाना प्रणालीचा विचारांची शिफारस