Mayur Ratnaparkhe
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यास हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्नीसह संगमावर पोहचले होते.
याप्रसंगी शिंदे दाम्पत्याने मनोभावे पूजा करत पवित्र स्नान केले.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी पूजा करताना श्रीफळ अन् कलश हाती घेतला होता.
महाकुंभमेळ्याला उपस्थित राहून त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचा अलौकिक आनंद घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आतापर्यंत ६० कोटी नागरिक येऊन गेले असून हा एक विक्रम आहे. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्यासह दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, उदय सामंत, संजय राठोड, मीरा भाईंदरचे विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह उपस्थित होते.
या कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले त्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष आभार.असं शिंदेंनी म्हटलं आहे.
यानिमित्ताने हिंदू चेतनेचा हा विशाल जनसागर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला मिळाली. अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभ परिसराची हवाई पाहणी देखील केली.