पुणे शहराला शिस्त लावणाऱ्या 'डॅशिंग' अधिकाऱ्यावर आता जिल्ह्याच्या सुरक्षेची धुरा

Deepak Kulkarni

भारतीय IPS पोलिस अधिकारी

संदीप सिंग गिल हे एक भारतीय IPS पोलिस अधिकारी आहेत

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

परिमंडळ एकचे उपायुक्त

पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

शांत आणि प्रभावी अधिकारी

ते शांत आणि प्रभावी अधिकारी म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे आणि आंदोलने यशस्वीरित्या हाताळली आहेत.

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती

पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे संदीपसिंह गिल यांची पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

गृह विभागाकडून बदलीचा आदेश

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. 

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

गणेशोत्सवाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी

पुणे शहरात कार्यरत असताना संदीपसिंग गिल यांनी गणेशोत्सवाच्या काळात शांतता व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी उत्तमरित्या बजावली होती

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

5 सप्टेंबर रोजीच बदली...

गिल यांची बदली 5 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली होती. व तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती.

Dashing IPS officer Sandeep Singh Gill | Sarkarnama

... म्हणून बदलीला स्थगिती

मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात पंकज देशमुख यांनी 'कॅट'कडे धाव घेतली होती. त्यानंतर देशमुख यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता संदीप गिल यांना पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकपदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

NEXT : मेलोनींसाठी दोनवेळा गुडघ्यावर बसले, बड्डेला गाणं म्हटलं... फिल्मी PM आहेत तरी कोण?

येथे क्लिक करा...