सरकारनामा ब्युरो
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी एका परिषदेसाठी अल्बानिया दौऱ्यावर गेल्या होत्या.
यावेळी तिराना इथे अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी चक्क गुडघ्यावर बसून मेलोनी यांचे स्वागत केले.
पाऊस असल्याने एडी रामा यांच्या हातात छत्री होती. पण मेलोनी रेड कार्पेटवर येताच छत्री बाजूला ठेवत ते गुडघ्यावर बसले.
मेलोनी यांनाही अशा स्वागतामुळे आश्चर्याचा धक्का बसला. या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एडी रामा यांनी याआधी युएईमध्येही मेलोनींचे अशाच पद्धतीने स्वागत केले होते. त्यावेळीही हे दृश्य पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी गाणेही गायले होते. त्यानंतर मेलोनींना स्कार्फ भेट दिला होता.
ए.डी. रामा यांची अल्बानियाच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या समाजवादी पक्षाला चौथ्यांदा बहुमत मिळाले आहे.
ए. डी. रामा हे 2013 पासून अल्बानियाचे पंतप्रधान आहेत. म्हणजे मागच्या 12 वर्षांपासून चाव्या त्यांच्या हातात आहेत.