उपमहापौरांना कोणते अधिकार असतात? की पद फक्त मिरवायलाच?

Rashmi Mane

उपमहापौर म्हणजे कोण?

महानगरपालिका प्रशासनात उपमहापौर हे महत्त्वाचं घटनात्मक पद आहे. महापौरांच्या अनुपस्थितीत शहराच्या कारभाराची जबाबदारी उपमहापौरांकडे येते. लोकप्रतिनिधी म्हणून ते नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा असतात.

Sarkarnama

महापौर नसताना जबाबदारी कोणाची?

महापौर आजारी असतील, बाहेर दौऱ्यावर असतील किंवा पद रिक्त असेल, तर उपमहापौर महापौरांचे सर्व अधिकार वापरतात. बैठका घेणे, निर्णयांना मंजुरी देणे ही जबाबदारी त्यांची असते.

Sarkarnama

सभांचं अध्यक्षपद उपमहापौरांकडे

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा, विशेष सभा किंवा तातडीच्या बैठकींचं अध्यक्षपद उपमहापौर भूषवू शकतात. सभेतील शिस्त, चर्चेचं नियोजन आणि मतदानाची प्रक्रिया ते सांभाळतात.

निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका

उपमहापौर विकास प्रकल्प, ठराव, निधी वाटप आणि नागरी समस्या यावर निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात.

Sarkarnama

नागरिकांच्या प्रश्नांचा आवाज

रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज अशा मूलभूत प्रश्नांसाठी उपमहापौर नागरिकांच्या वतीने आवाज उठवतात.

समित्यांवर देखरेख

महानगरपालिकेतील विविध समित्या, स्थायी समिती व उपसमित्यांच्या कामकाजावर उपमहापौर लक्ष ठेवतात.

Sarkarnama

प्रशासनावर नियंत्रणाचा अधिकार

उपमहापौर थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकत नाहीत, मात्र प्रश्न विचारणे, माहिती मागवणे आणि कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना असतो.

Sarkarnama

शहराच्या विकासात उपमहापौरांचे महत्त्व

उपमहापौर हे केवळ दुय्यम पद नसून शहराच्या प्रशासनातील महत्त्वाचा कणा आहेत. योग्य नेतृत्व आणि सक्रिय सहभाग असेल, तर शहराच्या विकासाला वेग देण्याचं काम उपमहापौर करतात.

Sarkarnama

Next : UPSC परीक्षेचे फॉर्म सुटले! जनरलपासून SC-ST पर्यंत, कोणाला किती वेळा देता येणार परीक्षा? 

येथे क्लिक करा